महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार अर्ज, निवेदन सादर करण्यास इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत

 


अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्याबाबत शासनाने सूचित केलेले आहे.

             महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये पिडीत, तक्रारदार महिलांचे केवळ वैयक्तिक स्वरुपाचे अर्जच स्विकारले जातात. तक्रार,निवेदन दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबतचे अर्ज, सेवा विषयक अर्ज, आस्थापनाविषयक अर्ज स्विकारले जात नाहीत.

             तरी महिला लोकशाही दिन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार अर्ज, निवेदन सादर करण्यास इच्छुक असलेल्या महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,अलिबाग, घर नं. 738, निलपुष्प, नागडोंगरी-चेंढरे, MIDC कार्यालयासमोर,(दूरध्वनी क्र.02141-225321) येथे तक्रार अर्ज,निवेदन दोन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील  यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत