Posts

Showing posts from August 24, 2025

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

  रायगड (जिमाका) दि.25:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी कळविले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या कडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. तरी दि.13 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व स...

रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे

    रायगड जिमाका दि.25 : रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी आपल्या गावी गणेशोत्सवाला आल्यावर स्थानिक तलाठी-तहसिल कार्यालयाशी सपर्क साधून शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार रोहा डॉ. किशोर देशमुख यांनी केले आहे. महाराष्टाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या गणेशोत्सवाला बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात होत आहे. या सण,उत्सवाला बाहेर गाव, शहरातून मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ शेतकरी गणेशभक्त येत असतात. महसूल खात्याकडील रोहा तहसिल कार्यालयामार्फत शेतकरी, जनता-ग्रामस्थ यांना वेळोवेळी राज्य/केंद्र शासनाकडून जाहीर होत असलेल्या विविध योजना, नैसर्गिक अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होत असते. सदरच्या विविध योजना, नुकसान भरपाई लाभार्थी यांना प्राप्त होणे कामी सद्यस्थितीत ऑनलाईन (संगणक प्रणाली) प्रणालीचा वापर होत आहे. करीता लाथार्थी यांना त्यांचे बचतखाते त्यांचे आधारकार्ड नंबर बरोबर जोडले गेले असले पाहीजे.                  त्यामुळे तहसिल कार्यालयाकडून श...