रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे
रायगड जिमाका दि.25 : रोहा तालुक्यातील कोकणवासी ग्रामस्थ शेतकरी, जनता-ग्रामस्थांनी आपल्या गावी गणेशोत्सवाला आल्यावर स्थानिक तलाठी-तहसिल कार्यालयाशी सपर्क साधून शासकीय योजनाबाबत महत्वाचे ई-केवायसी पूर्तता करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार रोहा डॉ. किशोर देशमुख यांनी केले आहे.
महाराष्टाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या गणेशोत्सवाला बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात होत आहे. या सण,उत्सवाला बाहेर गाव, शहरातून मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ शेतकरी गणेशभक्त येत असतात. महसूल खात्याकडील रोहा तहसिल कार्यालयामार्फत शेतकरी, जनता-ग्रामस्थ यांना वेळोवेळी राज्य/केंद्र शासनाकडून जाहीर होत असलेल्या विविध योजना, नैसर्गिक अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर होत असते. सदरच्या विविध योजना, नुकसान भरपाई लाभार्थी यांना प्राप्त होणे कामी सद्यस्थितीत ऑनलाईन (संगणक प्रणाली) प्रणालीचा वापर होत आहे. करीता लाथार्थी यांना त्यांचे बचतखाते त्यांचे आधारकार्ड नंबर बरोबर जोडले गेले असले पाहीजे.
त्यामुळे तहसिल कार्यालयाकडून शेतकरी/जनता-ग्रामस्थ यांना वेळोवेळी मंजूर होत असलेले शेती, घर, गुरे नुकसानी, अॅग्रीस्टॅग, संजय गांधी निराधार योजना लाभ, पी.एम. किसान योजना लाभ, आयुष्यमान भारत योजना, तसेच 7/12 मधील वारसनोंदी बाबत प्रतिज्ञापत्रलेख, हक्कसोड पत्र याबाबत महत्वाचे ई-केवायसी करणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे. ही सर्व कामे उत्सवासाठी येणाऱ्या सर्व गणेशभक्त यांनी आवर्जून करावीत.
०००००००
Comments
Post a Comment