पाताळगंगा येथील एनआयएसएमच्या नवीन संकुलाचे उद्घाटन भांडवली बाजारातून संपत्ती निर्माण नव्हे तर नागरिकांचे कल्याण व्हावे; बॅाण्डसच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी निधी मिळावा -- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाताळगंगा येथील एनआयएसएमच्या नवीन संकुलाचे उद्घाटन भांडवली बाजारातून संपत्ती निर्माण नव्हे तर नागरिकांचे कल्याण व्हावे; बॅाण्डसच्या माध्यमातून शहरांच्या विकासासाठी निधी मिळावा -- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई दि २४: मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करणे हे भांडवली बाजाराचे उद्दिष्ट्य नसावे तर राष्ट्र उभारणी आणि नागरिकांचे यातून कल्याण व्हावे. राज्यातील किमान १० स्मार्ट शहरे म्युनिसिपल बॅाण्डसच्या माध्यमातून विकसित व्हावी तसेच शेतकऱ्यांना देखील वित्तीय बाजाराचा लाभ मिळावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते आज सेबीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थान (एनआयएसएम)च्या नव्या संकुलाचे उद्घाटन करतांना बोलत होते. याप्रसंगी राज्यपा...