लहान मुलांना करोना प्रादूर्भावापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण, कोविड-19 ची तपासणी व सर्वेक्षणाकरिता स्वतंत्र पथकांची निर्मिती
अलिबाग, जि. रायगड, दि.2 (जिमाका) : राज्यातही कोविड-19 चा प्रादूर्भाव असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोविड-19 व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यक्षेत्राप्रमाणे काम सुरू आहे. लसीकरण करणारे वैद्यकीय पथक व कोविड-19 साठी घरोघरी सर्वेक्षण करणारे पथक, कंटेनमेंट झोनमध्ये सर्वेक्षणाचे काम करणारे पथक असे वेगवेगळे नेमणे आवश्यक आहे, जेणेकरून ते एकमेकांच्या संपर्कात न येता आपआपले काम स्वतंत्रपणे करू शकतील. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार लसीकरण करण्यासाठी आरोग्य सेविका व आशा असे पथक गठित करण्यात आले आहे. तसेच कोविड-19 साठी तपासणी करण्यासाठी आरोग्य पुरुष व आरोग्य सहाय्यक पुरुष/महिला व इतर कर्मचारी यांचे पथक गठित करण्यात आले आहे. ज्या आरोग्य सेविका व आशांची लसीकरण करण्यासाठी नेमणूक करण्यात येईल, त्यांची कोविड-19 तपासणीकरिता नेमणूक करण्यात येऊ नये, तसेच तपासणी करण्याकरिता जे आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक पुरुष/महिला व इतर कर्मचारी नेमण्यात येतील, त्यांची लसीकरण पथकाकरिता नेमणूक करण्यात...