Posts

Showing posts from August 20, 2017

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 26 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,(जिमाका)दि.25 :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.61 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2534.08  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-             अलिबाग 09.00 मि.मि., पेण-10.00 मि.मि., मुरुड-10.00 मि.मि., पनवेल-38.60 मि.मि., उरण-05.00 मि.मि., कर्जत-37.00 मि.मि., खालापूर-38.00 मि.मि., माणगांव-11.00 मि.मि., रोहा-57.00 मि.मि., सुधागड-39.00 मि.मि., तळा-28.00 मि.मि., महाड-21.00 मि.मि., पोलादपूर-17.00, म्हसळा-17.20मि.मि., श्रीवर्धन-27.00 मि.मि., माथेरान-61.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 425.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 26.61 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 81.58 % इतकी आहे. 00000

अवयवदान जनजागृती अभियानात सहभागी व्हा - जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांचे आवाहन

Image
अलिबाग दि.24 :-   अवयवदान हे   जीवन देणारे महादान आहे.   त्यामुळे   राज्यात सर्वत्र 29 व 30 ऑगस्ट या दोन दिवस होणाऱ्या महा अभियानात सर्वांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. या अवयवदान संदर्भात जनजागृती करुन या महाअभियानात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले.    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान जनजागृती संदर्भात बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.               यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) श्रीधर बोधे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एस.एन.बडे, अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी   व अन्य अधिकारी   उपस्थित होते.           यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,   रायगड ज...

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन

अलिबाग,(जिमाका)दि.24:-   मिरा भाईंदर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या अनुषंगाने  निवडून आलेल्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड-अलिबाग या कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. अशा निवडून आलेल्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र  पडताळणी समिती रायगड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, गोंधळपाडा-अलिबाग (रायगड) येथे त्वरीत संपर्क साधावा. असे आवाहन विशाल नाईक,उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जातपडताळणी समिती, रायगड यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 06 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.24:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 06.55 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 2507.47  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 03.00 मि.मि., पेण-03.10 मि.मि., मुरुड-03.00 मि.मि., पनवेल-06.40 मि.मि., उरण-08.00 मि.मि., कर्जत-11.70 मि.मि., खालापूर-08.00 मि.मि., माणगांव-05.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-18.00 मि.मि., तळा-01.00 मि.मि., महाड-15.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-06.40मि.मि., श्रीवर्धन-06.00 मि.मि., माथेरान-10.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 104.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 06.55 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   80.75 % इतकी आहे. 00000

ग्राहकांच्या सुविधेला प्राधान्य द्या- ना. चंद्रशेखर बावनकुळे

Image
अलिबाग ,( जिमाका ) दि .23:- राज्याचे वीज उत्पादन हे अतिरिक्त होत आहे . ग्राहकांना २४ x ७वीज पुरवठा करण्यास सर्वोच्च प्राथमिकता आहे . अशा परिस्थितीत ग्राहकांना राज्य वीज वितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा व संबंधीत सेवा या विनाव्यत्यय उपलब्ध झाल्या पाहिजेत , असे निर्देश राज्याचे ऊर्जा , नवीन व नवीकरण ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना . चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले . पनवेल येथे ना . बावनकुळे यांनी आज वीज ग्राहकांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी जनता दरबार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी ना . बावनकुळे यांच्या हस्ते पनवेल व उरण तालुक्यातील पायाभूत   आराखडा 2 अंतर्गत उभारलेल्या 33 के . व्ही . उपकेंद्राचे तसेच दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत पुषपक नोड , वहाळ उभारण्यात येणाऱ्या  33 के . व्ही . उपकेंद्राचे भूमिपूजनही ना . बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले .  यावेळी खा . श्रीरंग वारणे , पनवेलच्या महापौर डॉ . कविता चौतमल , आ . प्रशा...