जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन


अलिबाग,(जिमाका)दि.24:- मिरा भाईंदर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या अनुषंगाने  निवडून आलेल्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड-अलिबाग या कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. अशा निवडून आलेल्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र  पडताळणी समिती रायगड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, गोंधळपाडा-अलिबाग (रायगड) येथे त्वरीत संपर्क साधावा. असे आवाहन विशाल नाईक,उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जातपडताळणी समिती, रायगड यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज