ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांनी नोंदणी करावी--उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते
अलिबाग , जि.रायगड , दि. 24( जिमाका) :- केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, 2008 पारित केला आहे. त्यानुषंगाने बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, सेरीकल्चर कामगार, भाजी आणि फळे विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार यांच्यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्यासाठी दि. 20 ऑगस्ट 2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जाणार आहेत. केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीबाबत मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अन्वये असंघटित कामगारांची व्याख्या :- गृह उद्योग करणारा, स्वयंरोजगार करणारा, असंघटित क्षेत्रात वेतनावर काम करणारा, संघटीत क्षेत्रातील कामगार ज्याला औद्योगिक विवाद अधिनियम, 1947 आणि सामाजिक सुरक्ष...