रायगड जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी -- विभागीय आयुक्त विलास पाटील
अलिबाग, जि.रायगड, दि.23 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या महत्वपूर्ण प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला अधिक गती द्यावी, याकामी येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करुन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांना दिले. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात (दि.22ऑक्टोबर 2021) रोजी विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील डीएफसीसीआयएल उरण, मुंबई-गोवा नॅशनल हायवे पनवेल ते इंदापूर व इंदापूर ते झारप, विरार-अलिबाग मल्टीपर्पज कॉरिडॉर, डीएमआयसी, पनवेल-कर्जत रेल्वे लाईनचे दुपदरीकरण या विकास प्रकल्पांबाबतचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती सुषमा सातपुते तसेच रायगड जिल्ह्य...