सखी केंद्र ठरले पिडीत महिलांसाठी आधारवड
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 - रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथी महिला व बालविकास विभागाचे सखी केंद्र हे पिडीत, संकटग्रस्त महिलांसाठी खरेखुरे आधारवड ठरले आहे. महिला व बाल विकास विभागातर्फे सखी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. (One Stop Centre) म्हणून पिडीत, अत्याचारग्रस्त, संकटग्रस्त महिलांना सर्व प्रकारची सेवा एकाच छताखाली मिळावी यासाठी ही सखी केंद्र सुरु करण्यात आले. रायगड जिल्ह्यातही हे केंद्र सुरु आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्यालयाअंतर्गत हे केंद्र आहे. याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, या केंद्रामार्फत मोफत निवास , वैद्यकीय सेवा, कायदेशीर सेवा, समुपदेशन, संकटकाळात प्रतिसाद व संकटमुक्ती सेवा, गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा कौटूंबिक अत्याचाराचा अहवाल तयार करण्यासाठी पोलीस सहाय्य, अन्य शासकीय विभागांची मदत, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा इ. सर्व सेवा मोफत पुरविल्या जातात. जुन 2017 मध्ये हे ...