सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8-  राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत यावर्षी 33 कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षत अलिबाग विभागातर्फे स.म. वडके विद्यालय चोंढी किहीम मध्ये येथे शनिवारी (दि. 6 रोजी) हरितसेनेचे माध्यमातून वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न  झाला.
यावेळी शाळेमध्ये मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व मुलांना वृक्ष लागवडीचे महत्व् समजावून सांगितले. तसेच चोंढी शाळा ते चोंढी नाका अशी वृक्ष दिंडी काढण्यात आली.यावेळी वृक्षारोपण व वृक्ष दिंडी कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागाचे सहा. वनसंरक्षक आर.एम.म्हात्रे, वनक्षेत्रपाल सामाजिक वनिकरण परिक्षेत्र अधिकारी श्रीमती गायत्री देवराज, शाळेच्या संचालक मंडळाच्यावतीने श्री. गणेश आमले. शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती कामिनी राऊत, वनपाल अलिबाग डी.एस.सोनावणे व कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज