पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा दौरा
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.7- बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. रविवार दि.9 रोजी सायंकाळी सहा वा. धोणखार चणेरा ता.रोहा येथे आगमन व भाजपा कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सात वा. धोणखार चणेरा येथून रोहाकडे प्रयाण. साडेसात वा. रोहा येथे आगमन व भाजप कार्यकर्त्यां समवेत बैठक. स्थळ : ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा शहर. साडेआठ वा. रोहा येथून महाडकडे प्रयाण. दहा वा. शासकीय विश्रामगृह महाड येथे आगमन व मुक्काम. सोमवार दि. 10 रोजी सकाळी साडेआठ वा. हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : हुतात्मा स्मारक महाङ अकरा वा. रायगड लोकसभा मतदार संघ भाजपा पदाधिकारी बैठक. स्थळ : पी.जी.हॉटेल महाङ दुपारी तीन वा. सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : भेलोशी विद्यालय महाङ चार वा. महाड येथून गोरेगाव ता.माणगावकडे प्रयाण. साडे चार वा. गोरेगाव ता.माण...