स्थानिकस्तरावर अधिकार प्रदान
अलिबाग जि.रायगड
(जिमाका)दि.4- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ऑक्टोबर 2018
ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी
तसेच सरपंच पदासाठी थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त
पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार दि. 23
ऑगस्ट पासून संबंधित ग्रामपंचायत हद्दीत निवडणूक आचारसंहिता अंमलात आली आहे. नवीमुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ 1
विभागातील एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहाळ ग्रामपंचायत तसेच परिमंडळ 2- पनवेल
विभागातील पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव, पळस्पे, पारगाव, पनवेल
तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोयंजे, वांगणी तर्फे वाजे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे
हद्दीतील आदई,विचुंबे, देवद,न्हावाशेवा पोलीस ठाणे हाद्दीतील गव्हाण, उरण पोलीस
ठाणे हद्दीतील कोप्रोली, जुई, विंधणे व मोरासागरी पोलीस ठाणे हद्दीतील हनुमान
कोळवाडा या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून दि. 26 सप्टेंबर
रोजी मतदान तर दि. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
त्या अनुषंगाने नवी मुंबई
पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 विभागातील एनआरआय पोलीस ठाणे व परिमंडळ 2
विभागातील पनवेल शहर, पनवेल तालुका,खांदेश्वर, उरण, न्हावाशेवा, मोरासागरी पोलीस
ठाणे हद्दीतील वर नमुद ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र पोलीस अधिनियम
1951 चे कलम 36 प्रमाणे स्थानिक अधिकाऱ्यांना मिरवणूकांचे मार्ग निश्चित करणे,
ध्वनीक्षेपकांची तीव्रता व कार्यक्रमाची वेळ यावर नियंत्रण ठेवणे, प्रचारसभांचे
ठिकाण, दिनांक व वेळ निश्चित करणे आदींबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे
अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सदरचे आदेश दि.28 पर्यंत लागू राहतील, असे नवी
मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment