Posts

Showing posts from June 28, 2026

भूमिहिन दारीद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन विक्रीस इच्छुक असणाऱ्या जमीन मालकांनी अर्ज करावेत

  रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका):- भूमिहिन दारीद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील भूमिहिन आदिवासी कुटूंबाना 4 एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा 2 एकर बागायती (ओलिताखालील) जमीन देणेबाबत प्रस्तावित आहे. याकरिता भूमिहिन दारीद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन विक्रीस इच्छुक असणाऱ्या जमीन मालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती तेजस्विनी गलांडे यांनी केले आहे. ‍िही योजना आदिवासी विकास विभागाच्या दि. 28 जुलै 2021 शासन निर्णयान्वये 100 टक्के अनुदानित आहे. शासन निर्णयानुसार जमिन विक्रीसाठी इच्छुक जमीन मालकांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करावेत. अर्जदाराचा जमीन विक्री करणारा/जमीन मालक विहीत नमुन्यांतील अर्ज, शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठी यांचे प्रमाणपत्र व 7/12 उतारा संबंधित परीसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबत प्रमाणपत्र, प्रस्तावित विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह...

विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन

  रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका):- भारत सरकारव्दारे विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) VB-G RAM G अधिनियम, 2025 मंजूर केले असून सदर अधिनियम सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (MGNREGA) ऐवजी अस्तित्वात येत असून दि.1 जुलै, 2026 पासून राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुषंगाने गुरुवार, दि.02 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन भवन, अलिबाग येथे विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-G RAMG) योजनेचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक रविंद्र राठोड यांनी दिली आहे.   केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या संबंधित केंद्रीय कायदा 2025 शी सुसंगत तरतुदींचा समावेश करून महाराष्ट्र राज्यात विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-G RAM G) योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केला आहे. तसेच, महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठीचे विधेयक राज्य विधिमंडळाच्या दोन्ही ...

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

  रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 4 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दर तिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे करावी, असे आवाहन   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त श्रीकांत  कोकाटे यांनी केले आहे.                  त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे जून,2026 अखेर संपणाऱ्या एप्रिल ते जून   या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov....

कन्यादान योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या दांपत्यांनी अर्थसहाय्याकरिता प्रस्ताव सादर करावेत

    रायगड-अलिबाग,दि.30(जिमाका):- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कन्यादान योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील दांपत्यांनी  अर्थसहाय्याकरिता प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन सहाय्यक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण    रायगड अलिबाग सुनील जाधव यांनी केले आहे. सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेवून विवाह करणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील दांपत्यांसाठी अर्थसहाय्य देण्याकरिता सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे देण्यात येणारे लाभ पुढीलप्रमाणे असती लः- सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेणाऱ्या मागासवर्गीय दांपत्यांना वस्तूरुपात देण्यात येणाऱ्या अनुदान रु.25000/- इतकी थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) पध्दतीने लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात येतील. सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना प्रती जोडप्यामागे रु. 4000/-प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येईल. योजनेचे...

अमृतची हरित ऊर्जा क्षेत्राकडे वाटचाल; राज्यभरात 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' उपक्रम युवक, महिला व ग्रामीण उद्योजकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी

  रायगड-अलिबाग, दि. ३० (जिमाका) : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'Go Green India' आणि 'Sustainable Mobility' या संकल्पनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून राज्यभरात 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवक, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (SHG), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजक तसेच ग्रामीण भागातील इच्छुक नागरिकांना ईव्ही (Electric Vehicle) चार्जिंग स्टेशन व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असून त्यानुसार ईव्ही चार्जिंग स्टेशनचे विस्तृत जाळे उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपांप्रमाणे राज्यातील विविध भागांत ईव्ही चार्जिंग स्टेशनची मागणी वाढत असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

  रायगड-अलिबाग,दि.30(जिमाका ):- मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व योजनेसाठी अर्ज     https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन भरणे  व शाळा नोडल अधिकारी ऑनलाईन पडताळणी करणे याकरिता  इमाव , विजाभज , विमाप्र  प्रवार्गार्तील इयत्ता 9 वी ते   12 वी मधील विद्यार्थ्यानी शाळा महाविद्यालयांशी संपर्क  साधून या   योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण    रायगड अलिबाग सुनील जाधव यांनी केले आहे. त्या अनुषंगाने या बाबींची अंमलबजावणी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमार्फत प्रभावीपणे करण्यात यावी, या दृष्टीने पुढील प्रमाणे सविस्तर सूचना देण्यात येत आहेत :- सर्व महाविद्यालयां नी POST MATRIC (मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना)- इयत्ता ११ वी व त्यापुढील स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत लागू असलेली योजना "PM-YASASVI POST MATRIC SCHOLARSHIP FOR OBC, EBC AND DNT STUDENTS" ही आहे. या  योजनेंतर्गत अर्ज स्वीकारणे व संस्थास्तरावर पडताळणी करण्यासाठी संबंधित...

विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करावे-- तहसिदार रोहा डॉ.किशोर देशमुख

    रायगड-अलिबाग,दि.29(जिमाका ):- भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रोहा तालुक्यात विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले असून मतदार यादीतील नावांची पडताळणी किंवा दुरुस्ती करण्यासाठी काटेकोर नियोजन आखण्यात आल्याचे तालुका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. मात्र यानुषंगाने आवश्यक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या शासकीय प्रितिनिधींना सहकार्य करावे, असे आवाहन सहा.मतदार नोंदणी अधिकारी, 191-पेण, 192-अलिबाग व 193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ तथा तहसिदार रोहा डॉ.किशोर देशमुख यांनी केले आहे. प्रशासनाने यासाठी अत्यंत सुटसुटीत आणि नागरिकस्नेही नियोजन केले आहे. ज्याची ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेतः बीएलओ (BLO) स्वतः देणार घरोघरी भेट (30 जून ते 29 जुलै 2026) मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः प्रत्येक नागरिकाच्या घरी भेट देणार आहेत. या काळात नोकरी करणारे घरी प्रत्यक्ष हजर नसले, तरी त्यांच्या कुटुंबातील इतर उपलब्ध सदस्य किंवा नातेवाईक ब...

विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) कार्यक्रम माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे --जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
  रायगड-अलिबाग, दि.29 (जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोगाने दि.14 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये घोषित केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यात दि.30 जून ते दि.29 जुलै 2026 या कालावधीत  'विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) मोहीम राबवली जात आहे.  या 'विशेष सखोल पुनरीक्षण 2026' (SIR) मोहीमेमध्ये माहिती घेण्याकरिता येणाऱ्या मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यास (BLO) मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने दि.14 मे 2026 रोजीच्या पत्रान्वये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षणाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यासह 16 राज्य व 3 केंद्र शासिक प्रदेशांमध्ये घोषित केला असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक- दि.1 ऑक्टोबर 2026 , तयारी, प्रशिक्षण व छपाई-20 जून ते दि.29 जून 2026, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत (BLO) घरोघरी भेटी-दि.30 जून ते दि.29 जुल...