शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी


 

रायगड-अलिबाग,दि.01(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 4 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दर तिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे करावी, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त श्रीकांत  कोकाटे यांनी केले आहे.

                 त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे जून,2026 अखेर संपणाऱ्या एप्रिल ते जून  या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment या टॅबवरील Employer (List a Job) याला क्लीक करुन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करावे लॉगिन झाल्यावर आपल्या आस्थापनेची माहिती अद्ययावत करुन ER-1 वर क्लिक करावे Enter ER-1 याद्वारेú आपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. हे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 जुलै, 2026 पर्यंत आहे, याची सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी नोंद घ्यावी. त्याच प्रमाणे प्रत्येक आस्थापनेने आपल्या आस्थापनेचा नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावी, या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा युजर आयडी/पासवर्ड याबाबत माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर - 02141-222029 अथवा या कार्यालयाचे लिपिक-टंकलेखक म.भा.वखरे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9421613757 वर संपर्क साधावा.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन