Posts

Showing posts from May 24, 2026

महाराष्ट्रात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरिक्षण मोहिम मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे

  रायगड-अलिबाग,दि.26(जिमाका) :-   भारतीय संविधानाच्या कलग 324 अन्वये प्राप्त अधिकारात भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision) घेण्याबाबत दि.24 जून 2025 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशात नमूद केल्याप्रमाणे यापूर्वी देशामध्ये 1952-56, 1957, 1961, 1965-1966, 1983-84, 1987-89. 1992-1995, 2002-2004 यावर्षी विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाने देशातील 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. संविधानाच्या कलम 326 प्रमाणे मतदार यादीमध्ये मतदारांचे नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असणे तसेच वयाची 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. मागील 20 वर्षामध्ये विशेष सखोल पुनरिक्षण घेण्यात आलेले नाही. दरवर्षी केवळ विशेष संक्षिप्त पुनरिक्षण घेण्यात आलेले आहे. मागील 20 वर्षात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प...