जागतिक युवा कौशल्य दिन कौशल्य प्रशिक्षण संस्थांचा गौरव
अलिबाग, दि.15 (जिमाका)- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या उत्कृष्ट संस्थांचा गौरव करण्यात आला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयातर्फे पेस स्कील ट्रेनिंग सेंटर, सांगुर्ली, ता.पनवेल, जिल्हा-रायगड येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी एल. अँड टी. बांधकाम कौशल्य विकास केंद्र, भोकरपाडा, पनवेल येथील प्राचार्य,तेजेराव पाटील, हे होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कौशल्य प्रशिक्षणाचे महत्व विषद केले. यावेळी जिल्हयातील खाजगी कौशल्य प्रशिक्षण संस्थांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी योजनेचे उत्कृष्ठ काम करणाऱ्या व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्थांना पारितोषिक वितरण करुन गौरविण्यात आले. त्यामध्ये एल. अँड टी. बांधकाम कौशल्य विकास केंद्र, भोकरपाडा...