चार कोटी वृक्ष लागवड रायगड जिल्ह्याची 105 टक्के उद्दिष्टपूर्ती


अलिबाग दि.14,(जिमाका):- राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत राबविण्यात आला. या मोहिमेसाठी रायगड जिल्ह्याला  10 लक्ष 59 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हाप्रशासनाने उत्कृष्ट नियोजन करुन  प्रत्यक्षात 11 लक्ष 18 हजार 117 रोपांची लागवड पुर्ण केली असून दिलेल्या उद्दिष्टाच्या 105 टक्के रोप लागवड केली आहे.
या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार,  राज्यात दि. 1 ते 7 जुलै या कालावधीत वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यात 10 लक्ष 59 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.  त्यासाठी जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर  यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्हास्तरीय नियोजन केले.
 जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ  1 जुलै रोजी करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व प्रशासकिय यंत्रणा, सामाजिक संस्था, व्यक्तींनी यात हिरीरीने सहभाग घेतला.   या मोहिमेत वन विभागाने  5 लक्ष 78 हजार 580 सामाजिक वनीकरण विभागाने 1 लक्ष 50 हजार जिल्हा परिषद यंत्रणेने 2 लाख 57 हजार 957 तर अन्य विभागांनी व संस्थांनी  मिळून एक लक्ष 31 हजार 580 असे एकूण 11 लक्ष 18 हजार 117 वृक्ष रोपांची लागवड केली आहे. दिलेल्या उद्दिष्टाशी एकूण 105.58 टक्के इतके उद्दिष्टपुर्ती झाली आहे.  या मोहिमेत जिल्ह्यात  डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये,ग्रामस्थ, नागरिकांनी सहभाग दिला.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज