ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2023 चा निकाल जाहीर
रायगड, (जिमाका) दि.11:- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालय , महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून बसलेले सर्वच्या सर्व परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती अलिबाग जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक यांनी दिली आहे. रायगड जिल्हा ग्रंथालय संघ आणि सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय , डोंगरे हॉल अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षे साठी रायगड जिल्ह्यातून 27 परीक्षार्थी बसले होते. या पैकी सर्व 27 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून , रायगड जिल्ह्याची उज्वल यशाची परंपरा या ही वर्षी कायम राखली आहे. ...