चला होवू जलसाक्षर…!
विशेष लेख क्र.12 दिनांक:-19 मार्च, 2021 वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याचा अनिर्बंध उपसा वाढल्यामुळे पाणीसाठे कमी होत आहेत, त्यातच पावसाचे अत्यल्प प्रमाण, ऋतूमानातील अनिश्चित बदल यामुळे देशातील अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. यावर मात करून पाण्याच्या बाबतीत भविष्यकाळ सुरक्षित करावयाचा असेल तर जलसंवर्धन व पाणीबचत ही काळाची गरज आहे. यासाठी “ जलसाक्षरता ” हा महत्त्वाचा घटक आहे. आपणास ज्ञात आहेच की, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी व सजीव सृष्टीच्या उत्कर्षासाठी पाणी हाच मूलभूत व अत्यावश्यक घटक आहे. यासाठी आता पाण्याचा काटकसरीने वापर, विहिरी-तलावाचे पुनर्भरण, पावसाचे पाणी साठविणे, उपलब्ध पाणी व पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब वापरात आणणे व त्याचे नियोजनपूर्ण जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असून यासाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. पाणी संवर्धनासाठी हे करूया:- Ø बागेसाठी व शेतीसाठी ठिबक सि...