महिला व बालविकास विभागाच्या योजनेसंबंधीच्या बनावट पोस्टकडे दुर्लक्ष करावे -- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला पाटील

 


अलिबाग,जि.रायगड,दि.18(जिमाका) :- घरातील वय वर्षे 21 ते 70 या वयोगटातील ज्या कर्त्या व्यक्तीचे दि.01 मार्च 2020 ते दि. 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत निधन झाले आहे, अशा विधवा महिलांना महिला व बालविकास विभागाच्या जिजामाता, जिजाऊ या योजनेंतर्गत रु.50 हजार प्रति लाभार्थी मिळतील, अशी पोस्ट सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सअप या अॅपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही पोस्ट खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना महिला बालविकास विभागामार्फत राबविली जात नाही. या व्हॉट्सअप मेसेजमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत