शासन आपल्या दारी” कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सर्वांनी योगदान द्यावे--जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे
रायगड(जिमाका)दि.29:- शासनाच्या विविध योजना खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शुक्रवार दि.5 जानेवारी 2023 रोजी दु. 12.30 वा माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री.म्हसे पुढे म्हणाले अनेक नागरिक हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही ते केवळ संबंधित शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक व शासन यांच्याम...