ग्राहक दिनानिमित ग्राहक जनजागृतीसाठी पथनाटय कार्यक्रम संपन्न

  


 

रायगड,दि.26(जिमाका):- जिल्हा पुरवठा कार्यालय रायगड-अलिबाग, सहा.आयुक्त, अन्न औषध प्रशासन, पेण, सहा. नियंत्रक, वैध मापन विभाग, अलिबाग तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 डिसेंबर 2023 रोजी ग्राहक दिनानिमित अलिबाग बसस्थानक तसेच अलिबाग बीच येथे ग्राहक जनजागृतीसाठी पथनाटय कार्यक्रम संपन्न झाला.

दि.24 डिसेंबर 2023 रोजी ग्राहक दिनानिमित प्राप्त असणाऱ्या हक्कांचे जसे की, सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क इ.चे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांनी शासनाला सहाय करण्याबाबत, जबाबदाऱ्या व कर्तव्ये, पावतीशिवाय माल खरेदी करताना किंमत व गुणवत्ता तपासून घेणे, तक्रार निवारणासाठी योग्य ठिकाणी दाद मागण्यास शिकावे, स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून शक्यतो काळजी घेणे इ. बत ग्राहकांमध्ये जागरुकता येणे आवश्यक असल्याने त्याप्रकारचे संदेश व माहिती प्रसिध्दी माध्यमांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय रायगड-अलिबाग व सहा.आयुक्त, अन्न औषध प्रशासन, पेण आणि सहा. नियंत्रक, वैध मापन विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रिझम संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी  उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज