क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा --अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे
क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा -- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे अलिबाग(जिमाका)दि.24:- औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन क्षयरोग निर्मुलनाचे काम करणे आवश्य्क आहे.असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी आज येथे केले. सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कुरुळ ता.अलिबाग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.अजित गवळी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर,परिवहन मंडळाचे व्यवस्थापक श्री.गिते,श्रीमती अनिता गोटे आदी मान्यवर उपस्थित होते. ड...