बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारणीकरिता अलिबाग तालुक्यातील मौजे वरसोली तर श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिवेआगर येथील शासकीय जागा हस्तांतरित
अलिबाग,जि.रायगड दि.30 (जिमाका):- संचालक, पर्यटन संचालनालय यांच्या पत्रान्वये शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटन वाढीसाठी बीच शॅक्स धोरण जाहीर करण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, ता.श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील पर्यटनवाढीसाठी ध्यास घेतला आहे. त्यापैकी दिवेआगर, ता.श्रीवर्धन व अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनाऱ्यावर बीच शॅक्स प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत बीच शॅक्ससाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे. त्याचबरोबर बीच शॅक्स उभारणीसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून बीच शॅक्स कार्यान्वित करण्याच्या प...