जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार-2020-21, 2021-22 कार्यक्रम संपन्न होणार दि.1 ऑक्टोबर रोजी

 


अलिबाग,जि.रायगड,दि.28 (जिमाका) :- जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार-2020-21,2021-22 साठी जिल्हा पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना दि.01 ऑक्टोबर 2021 रोजी कर्जत शेळके हॉल, नेरळ-किरवली रोड येथे गौरविण्यात येणार आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 01 ऑक्टोबर 2021 रोजी दु.12.05 वा. नियोजित आहे. या कार्यक्रमाबाबत करोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा विचार करता संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी वेळेचे नियोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम राज्यमंत्री, उदयोग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते व रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कु.योगिता पारधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

तरी रायगड जिल्हा परिषदेतील व पंचायत समितीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य तसेच सर्व अधिकारी, शिक्षणतज्ञ, सर्व पुरस्कारमूर्ती प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती, शिक्षण, क्रीडा व आरोग्य समिती, रायगड जिल्हा परिषद श्री.सुधाकर घारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीम.ज्योती शिंदे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज