जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्य पदाकरिताचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर व नोटीस बोर्डावर दि.05 ऑगस्ट पर्यंत होणार प्रसिद्ध

अलिबाग, दि.04 (जिमाका):- राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सदस्य पदाकरिताचे आरक्षण रहिवाशांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर व नोटीस बोर्डावर दि.05 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेश क्र. रानिआ/नप-2022/प्र.क्र. 02/का.6, दि.22 जुलै 2022 अन्वये राज्यातील 115 नगरपरिषदा व 9 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम 2022 जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडील वरील आदेशातील कार्यक्रमानुसार विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, कोकण भवन यांच्याकडील दि.04 ऑगस्ट 2022 रोजीच्या पत्रान्वये रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, ...