अनुसूचित जातीच्या नागरिकांकरिता महाप्रित मार्फत सुधारित निर्धूर चूलीचे होणार मोफत वाटप

इच्छुकांनी दि.15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


 

अलिबाग, दि.02 (जिमाका):- राज्यातील सर्व जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या नागरिकांकरिता महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) यांच्यामार्फत पर्यावरणीय अनुकूल सुधारित निर्धूर चूलीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या चुलींच्या वाटपासाठी निकषयोग्य रहिवाशांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.आर. म्हसकर यांनी केले आहे.

या लाभाकरिता लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा, दारिद्र्यरेषेखालील असावा तसेच त्याच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन नसावे, हे पात्रतेचे निकष आहेत.

तरी जिल्ह्यातील इच्छुक नागरिकांनी दि.15 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिक मर्यादित (महाप्रित) चे प्रादेशिक व्यवस्थापक किंवा जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी सर्व तपशिलांसाठी https://mahapreit.in व https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.आर. म्हसकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत