मतदार यादी द्वितीय संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार जिल्ह्यतील अधिकाधिक पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवण्याचे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांचे आवाहन दि. 25 जून ते 20 ऑगस्ट या कालावधीत अंमलबजावणी
रायगड, (जिमाका) दि. 27:--भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि. 25 जून ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीत द्वितीय संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हयातील अधिकाधिक पात्र नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी आवाहन केले आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 21 (2) अन्वये आगामी कालावधीत ज्या राज्यातील विधानसभा निवडणूक आहेत त्या राज्यात दि. 01 जुलै या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणेबाबत महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना आयोगाने निर्देश दिले आहेत. घरोघरी मतदार यादीत नावाबाबत पडताळणी होणार या पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमातर्गत दि.25 जून ते 24 जुलै दरम्यान मतदान केंद्र स्तरीय अधिकारी प्रत्येक मतदारांच्या घरोघरी मतदार यादीत नावनोंदणी, नावाबाबत पडताळणी करणे, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राचे प्रमाणिकरण व सुसूत्रीकरण करणे, मतदार यादी / मतदा...