सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे --विभागीय आयुक्त राजेश देशमुख

रायगड(जिमाका)दि.15:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये सर्व शासकीय विभागांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांसह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त राजेश देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, निवडणूकीतील प्रत्येक दिवस महत्वाचा असून ही निवडणूक इतर निवडणूकीपेक्षा वेगळी आहे. निवडणूक आयोगाने आपल्याला ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ न...