१९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये दि.१४ व दि.१५ नोव्हेंबर रोजी होणार दिव्यांग,ज्येष्ठांचे गृहमतदान

 

 

रायगड(जिमाका)दि.११:- १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील पोस्टल बॅलेटकरिता ८५+ मतदार ४७२  व दिव्यांग मतदार ११६ नी घरुन मतदान करण्याकरिता पोस्टल बॅलेटसाठी १२ ड अर्ज दिले आहेत. त्यानुसार १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये गुरुवार, दि.१४ व शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिव्यांग व ज्येष्ठांचे गृहमतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १९३-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील  दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश पाटील  यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मतदारसंघात गुरुवार, दि.१४ नोव्हेंबर रोजी गृहमतदानाकरिता २८ पथके कार्यरत असणार असून  शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी २८ पथके कार्यरत असणार आहेत. ही मतदान प्रक्रिया दोन दिवस सुरू राहणार आहे.

श्रीवर्धन मतदारसंघामध्ये ८५ वर्षांवरील ४७२ व दिव्यांग ११६ मतदार अशा एकूण ५८८ मतदारांची गृहमतदानासाठी नोंदणी करण्यात आली आहे. गुरुवार, दि.१४ व शुक्रवार, दि.१५ नोव्हेंबर २०२४ रोजी घरोघरी जाऊन मतदान केंद्राची उभारणी करूनटपाली मतदान घेतले जाणार आहे

येत्या २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, मतदानासाठी नागरिकांमध्ये जागरुकता यावी, म्हणून मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचे पवित्र कार्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश पाटील  यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक