Posts

Showing posts from January 23, 2022

जिल्ह्यात दि.12 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

    अलिबाग,दि.24,(जिमाका):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्री.संदिप वि. स्वामी यांनी कळविले आहे.                या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरण, मोटार आपघात प्रकरणे, 138 एन.आय ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र पालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीज वितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.                राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यव होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. त्यामुळे दि.12 मा...

कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न

           अलिबाग, दि.28 (जिमाका):- शासन आणि जिल्हा प्रशासन आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज   येथे केले. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी कातकरी समाजातील बांधवांना दाखले, रेशनकार्ड वाटपाचा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करीत आज ग्रामपंचायत हॉल कुरुळ अलिबाग सभागृह येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.    यावेळी उपविभागीय अधिकारी अलिबाग प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मीनल दळवी   तसेच अलिबाग, नागाव, चौल, रामराज, पोयनाड, चरी, कामार्ले, किहीम, सारळ या मंडळातील मंडळ अधिकारी उपस्थित होते.                यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, स्थानिक तरुणांनी प्रशासकीय सेवेमध्ये येण्याकरिता गरुड झेप फाऊंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमांमध्...

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग,दि.28 (जिमाका):-   राज्यमंत्री उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय तथा पालकमंत्री रायगड ना.कु.आदिती तटकरे यांचा रविवार, दि.30 जानेवारी 2022 रोजीचा रायगड जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे- रविवार, दि.30 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा. सुतारवाडी येथील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. स्थळ : गिताबाग, मु.सुतारवाडी, पो.जामगाव, ता.रोहा. दुपारी 3.30 वा. सुतारवाडी, ता.रोहा येथून शासकीय वाहनाने मौजे वाशी ता.तळाकडे प्रयाण. सायं. 4.00 वा. मौजे वाशी, ता.तळा येथील वाशी-महागाव रस्त्याचे उद्घाटन कार्यक्रम. सायं.4.15 वा. मौजे वाशी येथून शासकीय वाहनाने मौजे सोलमवाडीकडे प्र याण. सायं. 4.30 वा. मौजे सोलमवाडी येथे आगमन व विविध विकासकामांचे भूमीपुजन, सोलमवाडी येथे सामाजिक सभागृहाचे भूमीपुजन समारंभ, सोलमवाडी अंतर्गत रस्ता करणे, सोलमवाडी येथे विद्युत पोल बसविणे. सायं. 5.00 वा. मौजे सोलमवाडी येथून शासकीय वाहनाने मौजे साईधामकडे प्रयाण. सायं.5.10 वा. मौजे साईधाम येथे आगमन व रस्त्याचे उद्घाटन करणे समारंभास उपस्थिती. ...

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,दि.28(जिमाका) :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.12 जानेवारी 2022 रोजी मार्गदर्शक सूचनानुसार नागरिकांनी कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करावी. तसेच ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य यंत्रणेला कळवावे व त्वरीत योग्य ते उपचार घ्यावेत. आरोग्य यंत्रणेने ही कीट नागरिक जास्तीत जास्त वापरतील व चाचणी पॉझिटीव्ह आल्यास तात्काळ शासकीय यंत्रणेला कळवतील, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सर्व मेडीकल स्टोअरवरील विक्रेत्याने या कोरोना चाचणी कीट वापराबाबत नागरिकांना मागर्दशन करावे, असे आवाहन जिल्हा  प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 00000

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
  अलिबाग,दि.26 (जिमाका) :-   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताकदिनाच्या 72   व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर   यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)   श्रीमती स्नेहा उबाळे,    जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, तहसिलदार विशाल दौंडकर, श्रीमती मिनल दळवी, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी   प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त   उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. ०००००

नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
    अलिबाग, दि.26 (जिमाका) :-   समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याच्या   उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे   यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील...

महाड येथील कायमस्वरूपी एनडीआरएफ बेस कॅम्प उभारण्याच्या प्रक्रियेत आणखी एक यशस्वी पाऊल --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

  अलिबाग,दि.25, (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी आवश्यक असलेली शासकीय जागा दुग्धव्यवसाय विभागाने देण्याबाबत सहमती दिली होती. त्यानुसार शासकीय दूध योजना महाड येथील 2.57.46 हेक्टर आर. पैकी 2-00.00 हे. आर इतके क्षेत्र राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना कायमस्वरुपी बेस कॅम्प तयार करण्यासाठी   संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्या नावे वर्ग करण्यात आले आहे,   अशी माहिती जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.               रायगड जिल्ह्यासह कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनादेखील आपत्ती काळात तातडीच्या बचाव व मदतकार्यास महाड येथे होणाऱ्या एनडीआरएफ बेसकॅम्पमुळे उपयोग होणार आहे. त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील हे एक यशस्वी पाऊल असल्याचे पालकमंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.             वातावरणीय बदल, चक्रीवादळे होणे, दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे होणारी पूरपरिस्थिती, भू-सख्खलन आदी परिस्थितीत दुर्दे...

रायगड जिल्ह्यातील न्यायालयीन यंत्रणेचे भौतिक सक्षमीकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न महाड दिवाणी न्यायालयासाठी शासकीय जागा प्रदान

  अलिबाग,दि.25, (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर यांच्या न्यायालयाकरीता महाड येथील महाराष्ट्र शासन दूध योजना, मुंबई यांच्या नावे असलेली स.नं.72/2/6 व इतर एकूण क्षेत्र 2-57.46 हे-आर पैकी 0-57.46 हे-आर इतके क्षेत्र महसूल विभागामार्फत प्रदान करण्यात आले आहे, अशी माहिती विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती सुनील तटकरे यांनी दिली.                राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड दिवाणी न्यायालयात न्यायालयीन युक्तीवाद केल्याचा इतिहास आहे. अशा या ऐतिहासिक महाड दिवाणी न्यायालयाचे व सामुग्रीचे जतन संवर्धन करणे गरजे होते. महाड तालुका अतिपर्जन्याचा भाग असून पूरप्रवण क्षेत्र आहे. मागील वर्षी जुलै महिन्यातील पूरामुळे या न्यायालय इमारतसह व दस्ताऐवजांचे मोठे नुकसान झाले होते. या न्यायालयाची भौतिक, अनुषंगिक सुविधा व सक्षमीकरण गरजेचे आहे. त्यानुसार दिवाणी न्यायालय वरिष्ठ   स्तर, न्यायाधिश निवासस्...