प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न
अलिबाग,दि.26 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात
प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी
डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी अपर
जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन
अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील,
उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुषमा सातपुते, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती
स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय
अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा, तहसिलदार
विशाल दौंडकर, श्रीमती मिनल दळवी, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद
वाकडे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम
ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी प्रजासत्ताकदिनाच्या 72 व्या
वर्धापनदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.
०००००
Comments
Post a Comment