पालकांकडून अर्भकाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनास यश -उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील

अलिबाग, दि.21 (जिमाका):- एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलांना समुपदेशन व योग्य एआरटी औषधोपचार व बालकांना नेव्हीरपीन सिरप देऊन बालकांना होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊन बालकांच्या व महिलांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होऊन त्या सर्वांना जीवन जगण्याचे बळ मिळते. पालकांकडून अर्भकाला होणार एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनाचे काम समाधानकारक असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांनी नुकतेच येथे केले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय या विभागाची जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण समितीची, जीपा व एएमटीसीटी याबाबतची सन 2022-23 मधील प्रथम व द्वितीय सत्राच्या त्रैमासिक आढावा सभा रायगड जिल्हाधिकारी बैठक सभागृहामध्ये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, जिल्हा ...