कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना पनवेल मिशन वात्सल्य समितीकडून दिवाळीनिमित्त विविध वस्तूंचे वाटप

 


अलिबाग, दि.20 (जिमाका):- कोविड-19 मुळे आई-वडील असे दोन्ही पालक गमावलेल्या चार अनाथ बालकांपैकी अनिकेत बाबू दडस (वय 17 वर्षे), स्वर्णिम अश्विन काकडे (वय 4 वर्षे) या दोन अनाथ बालकांना जिल्हाधिकारी तथा मिशन वात्सल्य समिती, रायगड चे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समिती पनवेल, ग्राम स्वराज्य समिती महाराष्ट्र, रोटरी क्लब, हिंदाल्को कंपनी, युवा स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत दिवाळी सणानिमित्त मिठाई, फराळ, शालेय साहित्य आदी वस्तूंचे वाटप तहसिल कार्यालयात तहसिलदार तथा पनवेल मिशन वात्सल्य समितीचे अध्यक्ष विजय तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच यावेळी राज कृष्णा पाटील (वय 15 वर्ष), सलोनी कृष्णा पाटील (वय 13 वर्षे) ही अनाथ भावंडे तहसिल कार्यालयात उपस्थित राहू न शकल्यामुळे मिशन वात्सल्य समिती पनवेल यांनी याची दखल घेत त्यांच्या घरी जावून मिठाई, फराळ, शालेय साहित्य आदी वस्तूंचे वाटप केले.

याप्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.चेतन गायकवाड. विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली वैदू, हिंदाल्को कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री.लहू रौंधाल, ग्राम स्वराज्य समिती महाराष्ट्र चे सचिव श्री.अल्लाउद्दीन शेख उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत