जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
रायगड(जिमाका)दि.22 :- राष्ट्रीय पशुधन अभियान समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पशुसंवर्धन विभाग रायगड यांच्यामार्फत शुक्रवार, दि.23 ऑगस्ट 2024 रोजी नियोजन समिती सभागृह, नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे सकाळी 11.00 वाजता जिल्हास्तरीय एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून जिल्हातील इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यशाळेस उपस्थित राहून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध योजानांचा लाभ घेवून जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका साकारावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाडे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, मुंबई विभाग, मुंबई, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, रायगड-अलिबाग, प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील देशी पशुधनाच्या विविध जातींचा विकास करून त्यांची उत्पादकता वाढविणे व पशुपालकांमध्ये उद्योजकता विकसित करून नव उद्योजक निर्माण करून पशुपालन हा प्राथमि...