निवृत्तीवेतन योजना पंधरवडा कोषागार कार्यालयात प्रशिक्षण
निवृत्तीवेतन योजना पंधरवडा कोषागार कार्यालयात प्रशिक्षण अलिबाग,दि.30,(जिमाका):- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धती व त्यासंदर्भातील उपलब्ध सेवा याबाबत जागरुकता आणण्यासाठी निवृत्तिवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. यासाठी या योजनेचे सभासद व आहरण संवितरण अधिकाऱ्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावरील कोषागार कार्यालयात प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पंधरवाड्यात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील अधिकारी,कर्मचारी यांचे प्राण खातेवरील वैयक्तिक माहिती अद्यावत करण्यासाठी एस-2 फॉर्म भरुन कोषागारात सादर करणे. सभासदांनी प्राण खात्यावर नामनिर्देशन (Nomination) आहे किंवा नाही याची खात्री करावी नसल्यास नामनिर्देशन (Nomination) कोषागारास कळवून त्याची नोंदणी करुन घेणे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत Exit Withdrawal बाबतची कार्यवाही करुन आवश्यक ती कागदपत्रे कोषागारात सादर करावी. आहरण व ...