मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह
प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ
अलिबाग,दि.28:-(जिमाका)-सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय मुलांना शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश देण्यात येतो. यंदाही मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, तळा-तालुका क्रीडा संकुलाजवळ, बोरघर हवेली, ता.तळा, मागासवर्गीय मुलांचे  शासकीय वसतीगृह,महाड- तालुका पोलीसस्टेशन जवळ, नवे नगर महाड या शासकीय वसतीगृहात गरीब,  हुशार,  होतकरु,  मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग ) गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत आहे.
या वसतीगृहात विद्यार्थ्यांना निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. तसेच वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखनसाहित्याकरीता महाविद्यालयीन प्रवेशितास चार हजार रुपये वार्षिक भत्ता दिला जातो. शालेय प्रवेशितांस शैक्षणिक साहित्य विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरीता म्हणून दरमहा पाचशे रुपये निर्वाहभत्ता, गणवेश भत्ता दिला जातो.
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न (अनु. जाती, विद्यार्थ्यांकरिता) दोन लाख रुपयांच्या आत व ( विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग घटकातील विद्यार्थ्यांकरिता) एक लाख  रुपयांच्या आत असेल अशांनी अर्ज करावा. अर्जासोबत सन 2017-18 मधील उत्पन्नाचा दाखला व जातीचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक बोनाफाईड, सर्टिफीकेट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पास बुकची छायांकित प्रत,आधार कार्ड व दोन फोटो  जोडावे.
यापूर्वी सन 2017-18 मधील प्रवेशाकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कळविण्यात आले होते.तथापि शासनाच्या निर्देशानुसार चालु शैक्षणिक वर्षात सदर प्रवेश ऑनलाईन न करता प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्याने संबंधित वसतिगृहातून प्रवेश अर्ज घेवून त्यात नमूद केलेल्या आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतीसह पूर्ण भरुन सदर अर्ज वसतिगृहात जमा करावा.
यंदा प्रवेशासाठी अंदाजे 40 जागा रिक्त असून उपलब्ध रिक्त जागांच्या संख्येनुसार गुणानुक्रमे व जातनिहाय व अभ्यासक्रमनिहाय आरक्षणानुसार होतील. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह महाड व तळा यांचेशी वरील पत्त्यावर संपर्क साधावा. असे आवाहन केले आहे.
प्रवेश प्रक्रिया कालावधी याप्रमाणे-
शालेय विद्यार्थी शनिवार 1जुलै, अंतीम यादी प्रसिद्ध करणे   सोमवार दि. 3 जुलै, यादी अंतिम प्रवेश दिनांक शनिवार दि.15 जुलै पर्यंत, गुणवत्तेनुसार निवड यादी रविवार दिनांक 16 जुलै तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे मंगळवार दि. 25 जुलै 2017  पर्यंत. इयत्ता 11 वी  व विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि.6 जुलै, अंतीम यादी - शुक्रवार दि.7 जुलै, अंतिम प्रवेश- शनिवार 22 जुलै पर्यंत, गुणवत्ता यादी सोमवार 24 जुलै पर्यंत, विद्यार्थ्यांना प्रवेश देणे- सोमवार दि.31 जुलै 2017 पर्यंत.
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करावयाचा कालावधी, गुरुवार 20 जुलै, अंतीम यादी प्रसिद्ध करणे   शुक्रवार  दि. 21 जुलै, यादी अंतिम प्रवेश शनिवार दिनांक 5 ऑगस्ट  पर्यंत, गुणवत्तेनुसार निवड यादी रविवार दिनांक 6 ऑगस्ट तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सोमवार दि. 7 ते 20 ऑगस्ट 2017  पर्यंत. 
व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी-15 जुलै ते 14 ऑगस्ट,अंतिम यादी 16 ऑगस्ट पर्यंत, विद्यार्थी प्रवेश अंतीम मुदत दि.31 ऑगस्ट, गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिध्दी दिनांक 1 सप्टेंबर, दुसऱ्या निवड यादी प्रवेश देणे दि.1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर.

0000

Comments