अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी - पालकमंत्री रविंद्र चव्हाण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.09 - : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी , अशा सूचना राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड रविंद्र चव्हाण यांनी आज पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित अतिवृष्टी व पूरपरिस्थिती आढावा बैठकीत दिल्या. यावेळी आ.प्रशांत ठाकूर, माजी आ.रविशेठ पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी महाड विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आदि उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शहरी व ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सखल भागात पाणी साचल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग, एनडीआरएफ, ...