जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री रविंद्र चव्हाण
अलिबाग
दि.8 ऑगस्ट- रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण
झाली होती. यामुळे जिल्ह्यात शेतपिकांचे, जमिनीचे, बांधबंधिस्ती, घरांचे झालेले
नुकसान, रस्त्यांची झालेली दुरावस्था तसेच गोठ्यांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले
आहे. मोठी, लहान दुधाळ, ओढकाम करणारी जनवारे इत्यादींचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्तांना वेळेत अनुदान देणे गरजेचे असल्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अनुदान देण्याची कार्यवाही करावी असे
निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान व अन्न नागरी
पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील
विविध शासकीय विभागांना दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment