वा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी विशेष मोहीमेचे आयोजन खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा
दा रायगड-अलिबाग,दि.09 (जिमाका):- जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये तब्बल 158 कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी शिल्लक आहेत. या ठेवींचा परतावा 4 कोटी 75 लाख 127 खातेदारांना मिळवून देण्यासाठी दि.01 ऑक्टोबर ते दि.31 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी यांनी दिली आहे. श्री.कुलकर्णी यांनी सांगितले की, देशभरात सुमारे 1 लाख 35 हजार कोटी रुपये दावा न केलेल्या ठेवींच्या स्वरूपात विविध बँकांमध्ये पडून आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5 हजार 866 कोटी रुपये शिल्लक असून, त्यात वैयक्तिक खात्यांचे 4 हजार 612 कोटी, संस्थांचे 1 हजार 82 कोटी, आणि सरकारी योजनांतील 172 कोटी रुपये समाविष्ट आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (Depositor Education and Awareness Fund - DEAF)’ मध्ये ...