जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी व्यसन मुक्तीचा समुपदेशनपर कार्यक्रम संपन्न
रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका):- कारागृहविभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रिदवाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने अलिबाग जिल्हा कारागृह प्रशासनामार्फत बंद्यांसाठी (दि.04 ऑक्टोबर 2025) रोजी व्यसन मुक्तीचा समुपदेशनपर कार्यक्रम संपन्न झाला.
कारागृहातील बंद्यांना तंबाखुजन्य तसेच नशायुक्त पदार्थाचे सेवनामुळे त्यांच्या शरीरावर व मनावर होणारे दुष्परिणाम समजून सांगून व्यसनापासून दूर जाण्याकरिता बंद्यांचे मानसिक सबळीकरण करण्याबाबत डॉ.धनेश्वरी गोयर व डॉ.राजेश पवार, मानसोपचार तज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांनी बंद्यांना समुपदेशन केले. तसेच श्रीम. तेजस्विनी निराळे, सचिव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग यांनी व्यसनामुळे व्यक्तीच्या शरीरावर, मनावर तसेच कुंटुंब व्यवस्थेवर दुष्परिणाम होत असल्याने व्यसनापासून परावृत्त होण्याकरीता आवाहन करुन व्यसनमुक्तीमुळे बंद्यांचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरीता विशाल बांदल, प्र.अधीक्षक,अलिबाग जिल्हा कारागृह, श्रीम.धनेश्वरी गोयर व राजेश पवार, समोपदेशक जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग तसेच ॲड.मनिषा नागावकर, ॲड. तन्मय म्हात्रे, सहाय्यक लोकअभिरक्षक, श्रीम. नितल म्हात्रे, लिपीक जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, अलिबाग-रायगड, किशोर वारगे, तु.अ.श्रेणी-2, श्री.कुटे, सुभेदार व श्री.ठोंबरे व श्री. तारमळे, हवालदार तसेच श्री.नरसु कोळी, का.शिपाई इत्यादी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment