Posts

Showing posts from July 20, 2025

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

    रायगड,दि. 25 (जिमाका):- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची (शिधापत्रिकाधारक) ई- केवायसी असणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. लाभार्थ्यांचे शिधापत्रिकासोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद असलेली व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे.  त्यानुसार  सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड  सर्जेराव सोनावणे  यांनी केले आहे.   शिधापत्रिकांसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांकाचे प्रमाणिकर पूर्ण करण्यासाठी व रास्तभाव दुकानस्तरावर ई-केवासयी मोहिम राबविण्यात येत आहे. शासनाचे निर्देशान्वये धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांची  100 टक्के   ई-केवायसी करण्याबाबत सुचित केले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये  75 . 72 टक्के   लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. शासनाच्या पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थी या...

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

    रायगड,दि. 25 (जिमाका):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड या संस्थेतील वापरुन निर्लेखित झालेल्या साहित्याची विक्री जसे आहे त्या स्थितीत निविदा पध्दतीने करणे प्रस्तावित्त आहे. यामध्ये निर्लेखित झालेले यंत्रसामुग्री व उपकरणे इत्यादी साहित्याचा समावेश असून या निविदा प्रक्रियेकरीता लिफाफा पध्दतीने निविदा सादर करावयाची आहे. त्यासाठी फक्त जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात, असे आवाहन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एन.एस.पुरकर यांनी केले आहे. विक्री करावयाच्या वस्तू संस्थेतील संबंधीत विभागामध्ये दि. 2 5   जुलै  ते दि.2  ऑगस्ट  2025 या कालावधीत सुटीचे दिवस वगळून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यन्त पहावयास मिळतील. याच कालावधी दरम्यान सादर करावयाच्या विहीत नमुन्यातील निविदा अर्ज रु.300/-(अक्षरी रुपये तीनशे मात्र ) ना परतावा किंमतीत संस्थेच्या कार्यालयामधून विकत घेता येईल. सदर नमुन्यातील पूर्ण माहीती अचुक पणे भरलेली निविदा अर्जासोबत रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र)  अनामत रक्कम जमा करणे गरजेचे असेल सद...

पनवेल येथे दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकासाठी नवीन मालिका सुरु

    रायगड,दि. 25 (जिमाका)   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना दुचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि. 29 जुलै 2025 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते दुपारी 02.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, निवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी केले आहे. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि. 29 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्याची नोंद घेऊन दि.30 जुलै 2025 रोजी कार्यालयीन वेळेत दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रक्कमेचा धनाकर्षण (DD) बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा अतिरीक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रु. चा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षण विचार केला जाणार नाही....

डाक विभागात IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी एक डिजिटल उत्क्रांतीची सुरवात

      रायगड(जिमाका) दि.24:-  भारत सरकारच्या डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधामध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याकरता डाक विभागात   IT 2.0   या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. या प्रणालीमुळे डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणारी सेवा ही अचूक, जलद व ग्राहकाभिमुख होईल.          या   IT 2.0   प्रणालीची अंमलबजावणी ही दि. 05 ऑगस्ट 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात ( प्रधान डाकघर , उपडाकघर, शाखाडाकघर ) होणार आहे. याकरिता   Data Transfer   ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया असते जी दि. 04 ऑगस्ट 2025 (सोमवार) रोजी केली जाईल. या कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील डाक कार्यालयासंबधित सर्व कामे ही दि. 04 ऑगस्ट 2025 (सोमवार) रोजी बंद राहतील. सर्व ग्राहकांनी त्यांची डाक कार्यालयासंबधित जी काही तातडीची कामे आहेत. दि. 02 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करून घ्यावीत.  ग्राहकांच्या हितासाठी व त्यांना अचूक, जलद व ग्राहकाभिमुख सेवा मिळावी याच उद्देशाने हे सर्व प्रयत्न केले जात आहेत. सर्व ग्राहका...

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

    रायगड (जिमाका) दि.24:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी कळविले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हयातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या कडील घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, विजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. तरी दि.13 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल...