डाक विभागात IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी एक डिजिटल उत्क्रांतीची सुरवात

 

 

  रायगड(जिमाका) दि.24:- भारत सरकारच्या डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधामध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याकरता डाक विभागात IT 2.0 या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. या प्रणालीमुळे डाक विभागाद्वारे पुरविण्यात येणारी सेवा ही अचूक, जलद व ग्राहकाभिमुख होईल.

      या IT 2.0 प्रणालीची अंमलबजावणी ही दि. 05 ऑगस्ट 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात ( प्रधान डाकघर , उपडाकघर, शाखाडाकघर ) होणार आहे. याकरिता Data Transfer ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया असते जी दि. 04 ऑगस्ट 2025 (सोमवार) रोजी केली जाईल. या कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील डाक कार्यालयासंबधित सर्व कामे ही दि. 04 ऑगस्ट 2025 (सोमवार) रोजी बंद राहतील.

सर्व ग्राहकांनी त्यांची डाक कार्यालयासंबधित जी काही तातडीची कामे आहेत. दि. 02 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करून घ्यावीत.  ग्राहकांच्या हितासाठी व त्यांना अचूक, जलद व ग्राहकाभिमुख सेवा मिळावी याच उद्देशाने हे सर्व प्रयत्न केले जात आहेत. सर्व ग्राहकांनी याची कृपया नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज