प्रजासत्ताक दिन सोहळा मतदानाचा अधिकार वापरून लोकशाही बळकट करु या-ना. प्रकाश महेता
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- जगातील सर्वात मोठा लोकशाही देश ही आपली ओळख आहे. ही ओळख राज्यघटनेने आपल्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे आहे. आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक कोणतीही असो; आपला मतदानाचा अधिकार अवश्य वापरु या, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांनी आज येथे केले. प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापनदिन सोहळ्याचा रायगड जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित नागरिकांना ना. महेता यांनी संबोधित केले. या सोहळ्याला माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल.रामदास यांची सपत्निक उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा न्यायाधीश सेवलीकर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, ज...