इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षाः खाजगी विद्यार्थ्यांना प्रविष्ठ होण्यासाठी विलंब शुल्कासह मुदतवाढ
अलिबाग,जि. रायगड, दि.26,(जिमाका)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं.17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रकटनानुसार, फेब्रुवारी –मार्च 2019 मध्ये होऊ घातलेल्या इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांसाठी फॉर्म नं.17 ऑनलाईन भरुन प्रविष्ठ होण्याची मुदत संपली आहे. त्थापि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी विलंब व अतिविलंब शुल्क भरुन ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची मुदत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या याप्रमाणे- इयत्ता 10 वी शंभर रुपये विलंब शुल्कासह शुक्रवार दि.26 ऑक्टोबर ते मंगळवार दि.6 नोव्हेंबर. इयत्ता 12 वी 25 रुपये विलंब शुल्कासह शुक्रवार दि.26 ऑक्टोबर ते मंगळवार दि.6 नोव्हेंबर. तर अतिविलंब शुक्ल प्रतिविद्यार्थी 20 रुपये भरुन बुधवार दि.7 ते बुधवार दि.14 नोव्हेंबर. असे ...