पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  शनिवार दि.27 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार दि.27 रोजी सायं. साडेसात  वा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृह, मुरुड येथे आगमन व राखीव.
रविवार दि.28 रोजी सकाळी साडे सहा वा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रामगृह, मुरुड येथून मुरुड जंजिरा किल्ल्याकडे प्रयाण.  सकाळी सात वा. जंजिरा किल्ला येथे आगमन व जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रध्वज लावण्याच्या कार्यक्रमास उपस्थिती. सव्वा सात वाजता जंजिरा किल्ला येथून आगरदांडा जेट्टीकडे प्रयाण. साडेसात वा. आगरदांडा जेट्टी येथे आगमन व रो-रो सेवेने दिघी जेट्टीकडे प्रयाण.सकाळी आठ वाजता दिघी जेट्टी येथे आगमन व मोटारीने वडवली ता. श्रीवर्धन कडे प्रयाण.सकाळी साडेआठ वाजता मौजे वडवली ता. श्रीवर्धन येथे आगमन व स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी.सकाळी  आठ वा.पंचेचाळीस वाजता मौजे शिस्ते ता. श्रीवर्धन येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी. सकाळी साडे नऊ वा. मौजे श्रीवर्धन,ता. श्रीवर्धन येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी. पावणे दहा वाजता मौजे गोरेगांव, ता. माणगांवकडे प्रयाण.सकाळी  सव्वा दहा वाजता मौजे गोरेगांव ता.माणगांव येथे आगमन व स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी.  साडे दहा वाजता मौजे वडपाले ता. माणगांवकडे प्रयाण.  सकाळी पावणे बारा  वाजता मौजे वडपाले,ता.माणगांव येथे आगमन व स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी. दुपारी बारा वाजता मौजे वडपाले ता. माणगाव येथून कसबे शिवथर, ता. महाडकडे प्रयाण.  दुपारी दीड वाजता शिवथरघळ येथे आगमन व श्री समर्थ चरित्र चित्रप्रदर्शनी कार्यक्रमाचे उद्घाटन.  दुपारी दोन वाजता शिवथरघळ येथे मौजे वावे तर्फे हवेली ता. सुधागड कडे प्रयाण. सायंकाळी चार वाजता मौजे वावे तर्फे हवेली ता. सुधागड येथे आगमन व स्थानिक शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी. सायंकाळी पाच वाजता मौजे कानसळ, ता. सुधागड येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीची पाहणी. सायंकाळी सव्वा पाच वाजता मौजे कानसळ,ता.सुधागड येथून डोंबीवलीकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज