नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा - विभाग नियंत्रक अनघा बारटक्के

“ एस.टी. चा प्रवास सुरक्षित प्रवास ” अलिबाग, दि.05 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आलेला असल्याने रायगड राज्य परिवहन विभागातील सर्व आगारांमार्फत (महाड / अलिबाग / पेण / श्रीवर्धन / कर्जत / रोहा / मुरुड / माणगाव) दैनंदिन वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत रायगड राज्य परिवहन विभागातील सर्व आगारांमार्फत मिळून 850 फेऱ्या सुरू आहेत . तरी नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करून राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, पेण अनघा बारटक्के यांनी केले आहे. 00000