नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा - विभाग नियंत्रक अनघा बारटक्के
“एस.टी. चा प्रवास सुरक्षित प्रवास”
अलिबाग, दि.05 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आलेला असल्याने रायगड राज्य परिवहन विभागातील सर्व आगारांमार्फत (महाड / अलिबाग / पेण / श्रीवर्धन / कर्जत / रोहा / मुरुड / माणगाव) दैनंदिन वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत रायगड राज्य परिवहन विभागातील सर्व आगारांमार्फत मिळून 850 फेऱ्या सुरू आहेत.
तरी नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधूनच प्रवास करून राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, पेण अनघा बारटक्के यांनी केले आहे.
00000

Comments
Post a Comment