प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंपासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जाच्या ई-पोर्टलद्वारे ऑनलाईन/धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावा
अलिबाग,दि.13 (जिमाका):- राज्यातील महाकृषी अभियानांतर्गत प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एस.एम.एस. द्वारे कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी ऑनलाईन/धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास ई-पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्ट) प्रत अपलोड करुन नजीकच्या महाऊर्जाच्या कार्यालयास भेट देऊन जमा करावा. जिल्ह्यातील सौर कृषी पंपाचा सर्वसाधारण लाभार्थी कोटा संपल्यानंतर काही सर्वसाधारण गटातील शेतकरी अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या घटकांमधून चुकीचे जातीचे प्रमाणपत्र ई-पोर्टलवर अपलोड करुन अर्ज सादर करीत आहेत. संबंधित अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित लाभार्थी अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या घटकांमधील नसून सर्वसाधारण लाभार्थी म्हणून लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जाच्या संबंधित विभागीय कार्यालयामध्ये भेट देऊन अर्ज स्विकारण्यासाठी तगादा लावत आहेत. ...